१८९२ पासून
इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली. र्लॉड
कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा
उदय झाला. जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष
प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे. लाल, बाल, पाल
यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल
विचाराचा प्रसार केला.
जहालजवादाच्या उदयाची कारणे आणि कार्यक्रम
(१) सरकारचे अन्यायकारक धोरण
इंग्रजांचा
आर्थिक साम्राज्यवादातून राजकीय साम्राज्याचा उदय झाला भारतातून व्यापार,
कर, पगार, माध्यामातून प्रचंड संपज्ञ्ल्त्;ाी मायदेशी पाठवली.
(२) शेतकर्यांची पिळवणूक
भारतातील
जनता शेतीवर अवलंबून होती. नैसर्गिक संकटे, टोळधाडी यामूळे उत्पन्न मिळत
नसे तरीपण सरकारला कर द्यावा लागत असे सावकार व सरकारकडून आर्थिक पिळवणूक
होत असल्याने उपाशीपोटी जीवन जगावे लागे.
(३) नैसर्गिक संकटसंदर्भात जुलमी धोरण
१८९६-९७
व १९०० या काळात दुष्काळ पडून दोन कोटी लोकांना तडाख बसला तरीही सरकारने
उपाययोजना केली नाही. महाराष्ट्र्रात प्लेगच्या वेळी उपायोजना न करता
लोकांचा धार्मिक भावना दुखावल्या.
(४) १८९२ च्या कायद्याने असमाधान
या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळातील बिन सरकारी सभासदांची संख्या वाढवली परंतू राजकीय हक्क मर्यादित ठेवले.
(५) इंग्रजाचे दडपशाहीचे धोरण
१८८५-१९०५
या काळात र्लॉड लेन्सडाऊन, र्लॉडएलिगन, र्लॉड कर्झन यांनी अन्यायाी व
जूलमी कायदे केले. सरकारी नोकरीवर बंधने आणली. लष्करी व प्रशासकीय खर्चात
वाढ केल्याने लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
(६) बंगालची फळणी
इंग्रजांनी
भेदनीतीचे राजकारण करण्यासाठी बंगालची फाळणी केली. त्यातून बंगालमध्ये
सोनेर बंगला या संघटनेने वंगभंग चळवळ सुरु केली त्याचे नेतृत्व
सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी केले त्यामुळे चळवळीला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले.
(७) परदेशातील भारतीयांवर अन्याय
ब्रिटिशांच्या वसाहतीमध्ये भारतीय लोक नोकरी, व्यवसात व्यापारासाठी गेले होते. अनेक ठिकाणी अपमानस्पद वागणूक मिळत होती.
(८) लाल -बाल-पाल यांचे कार्य
इंग्रजांशी जशात तसे हा मार्ग स्वीकारून राजकीय हक्क मिळविण्यासाठी आक्रमक मार्ग स्वीकारला त्यामुळे जहालवादाचा उदय झाला.
मवाळ -जहाल- संघर्षाची कारणे
(१)
इंग्रजी सज्ञ्ल्त्;ाा देणगी आहे. मवाळवाद्यांचा विचार तर जहालवाद्यांचा
विचार, तो कलंक आहे. (२) इंग्रजामुळे प्रगती होईल असे मवाळवाद्यांचा विचार
होता. (३) प्रथम स्वराज्य नंतर सुधारणा अशी जहालवाद्यांची मागणी होती.
जहालवाद्यांचा कार्यक्रम
१९०५ च्या बनारस अधिवेशात चतुसुत्री तत्वांचा स्वीकार केला. या वेळी
मवाळ जहाल, गट पडले. १९०६ च्या कोलकज्ञ्ल्त्;ाा अधिवेशनात दादाभाईनी
चतु:सुत्रीचा ठराव मंजूर केला. स्वराज्य म्हणजे स्वंशासन असा होता. इतर वसाहतींप्रमाणेच प्रशासन भारतात असावे. स्वदेशी देशी उद्योगधंदे वाढवावे व स्वदेशी माल वापरावा बिहिष्कार सरकार मागण्यांचा विचार करत नाही तोपर्यत त्यांचा माल वापरु नये राष्ट्रीय शिक्षण भारतीय संस्कृती व सद्यस्थिती माहिती देणारे शिक्षणाचा भारतीयांनी स्विकार करावा.
लोकमान्य टिळकांचे कार्य
बाळ गंगाधर टिळक
याचा जन्म २३ जूलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्हयातील चिखली गावी झाला. १८७६
मध्ये ळ.ळ.भाषांतरांवरून. ची परीक्षा पास झाले. त्यांच्यावर मिल स्पेन्सर
यांच्या विचारांचा प्रभाव होता. लो टिळकांचे कार्य पुढीप्रमाणे.
लो. टिळक व कॉग्रेस :- कॉग्रेसच्या
स्थापना प्रसंगी टिळक हजर होते. तेव्हापासून टिळकांचा कॉंग्रेसशी सबंध
होता. इंग्रज भारतीयांवर अन्याय अत्याचार करत हाते, त्याला वाचा फोडण्याचे
व लोकजागृतीचे कार्य केले.
लो. टिळक सार्वजनिक सभा
१८९५
मध्ये मध्ये सार्वजनिक सभेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १८९६ च्या
दुष्काळप्रसंगी लोकांना मदत केली व सरकारच्या धोरणावर टीका केली. याचवेळी
संघर्ष करुन हक्क प्राप्त केले पाहिजेत असे लोकांना शिकवले लो. टिळक
जहालवाद इंग्रज अन्याय करत असताना मवाळवाद्यांचे धोरण त्यांना पसंत नव्हते
जशास तसे उत्तर देऊन इंग्रजांशी संघर्षाची भूमिका टिळकांनी घेतली होती.
त्यातून चतु:सुत्रीचा कार्यक्रम अंमलात आणला टिळक शैक्षणिक कार्य व
वृत्तपत्रे टिळकांनी आगरकर, चिपळूणकर, यांच्या मदतीने १८८० मध्ये न्यू
इंग्लिश स्कूलची स्थापना केली. १८८४ मध्ये डेक्कन एज्यूकेशन सोसायटीची
स्थापना करून १८८५ मध्ये फ़र्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. १८८१ मध्ये
केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरु करुन सरकारी धोरणावर टिका आणि लोकजागृतीचे
कार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमधून राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी
१८९३ मध्ये गणेशोत्सव आणि १८९६ मध्ये शिवजयंती उत्सव सुरु केले.
होमरुल लीगची चळवळ
बंगाल
फाळणीचे जहालवाद व क्रांतीवाद उदयास आला त्यांनी सरकारच्या
अन्यायाविरूध्द आवाज उठवला पहिल्या माहायुध्दाचा भारतीय राजकारणावर परिणाम
होऊन ब्रिटिश विरोधी स्वांतत्र्यासाठी होमरूल चळवळ सुरु झाली. टिळकांनी
स्वराज्याच्या मागणीसाठी होमरुल चळवळ सुरु केली. आयर्लडच्या धर्तीवर
भारतात आंदोलन करावे यासाठी डॉ अॅनी बेझंट यांनी टिळकांची भेट घेतली आणि
चळवळीला प्रारंभ केला.
होमरूल लीगची स्थापना व उद्देश
डॉ.
अॅनी बेझंट मूळच्या आयरिश असून भारतात थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य करत
होत्या भारताच्या विकासाठी स्वराज्य गरजेचे आहे म्हणून त्यांनी भारतीय
राजकारणात प्रवेश केला. लो टिळकांशी चर्चा करून १९१६ मध्ये मद्रास येथे
होमरूल लीगची स्थापना केली. मद्रास, मुंबई, कानपूर इ. ठिकाणी शाखा स्थापन
केल्या आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कॉमन विल व न्यू इंडिया ही
वूज्ञ्ल्त्;ापत्रे सुरु केली . या संघटनेचा उद्देश म्हणजे स्वशासनासाठी
लोकमत तयार करणे राजकीय जागृती करणे इंग्रज सरकारने त्यांच्या
वर्तमानपत्रावर बंदी घातली त्यांना व त्यांच्या सहाकार्यांना अटक केली.
अनेक प्रांतात प्रवेशबंदी घातली अमेरिकेत लोकांचा पाठिंबा मिळविला.
लो. टिळकांना प्रारंभी युध्दाच्या संदर्भात इंग्रजांनी पाठिंबा दिला,
तरीपण स्वराज्याची मागणी तीव्र केलीच स्वराज्य म्हणजे इंग्रजांची
हकालपट्टी अशी इंग्रजांची भावना झाल्याने लो. टिळकांनी होमरूल हा शब्द
वापरायला सुरुवात केली महाराष्ट्र्रात एप्रिल १९१६मध्ये होमरूल लीग म्हणजे
स्वराज्य संघाची स्थापना केली. डॉ. बेझंट व लो. टिळक यांनी स्वतंत्र दोन
संघटना स्थापन केल्या परंतु कार्य एकत्र केले.
होमरूल लीेगचे कार्य
सर्व देशभर दौरे काढून व वृत्तपत्रातून सामान्य लोकांना स्वराज्याच्या
हक्काची जाणीव करुन दिली. इंग्रजांच्या दडपशाही धोरणामुळे सर्व स्तरातील,
जातीधर्माच्या स्त्री पुरुषांनी चळवळीत सहभाग घेतला. इंग्रजांनी वाढत्या
चळवळीला पायबंद घालण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारुन वृत्तपत्रावर बंदी,
नेत्याना इतर प्रांतात प्रवेश बंदी घातली, मॉटेग्यूच्या मते होमरुल चळवळी
ही कॉग्रसची चळवळ आहे.
१९१९ चा मॉटफ़ोर्ड सूधारणा कायदा
पहिल्या
महायूध्दाच्या काळात भारतीयांनी इंग्रजांना पाठिबां दिला आणि स्वराज्याची
मागणी केली. सरकारने दुर्लक्ष केल्याने भारतात असंतोष निर्माण झाला. या
पार्श्वभूमीवर १९१९ चा कायदा मंजूर केला. त्याचंी कारणे पुढीलप्रमाणे.
(१) १९०९ कायद्याने असमाधान
भारतीयांची वसाहती अंतर्गत स्वराज्याची मागणी नाकारली. जातीय मतदार संघ निर्माण करून दुहिचे बीजारोपण केले.
(२) क्रांतिकारकांचे प्रयत्न
इंग्रजांनी
दिलेल्या सुधारणा अपुर्या असल्याने क्रांतिकारी चिडले होते त्यांनी अनेक
इंग्रज अधिकार्यांना ठार मारले. हा दहशतवाद नष्ट करण्यासाठी
(३) आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम
बेल्जियमच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढत आहोत असे इंग्लडचे पंतप्रधान
ग्रे यांनी जाहीर करुन पहिल्या महायूध्दात प्रवेश केला. तेच इंग्रज
भारतीयांना स्वातंत्र्य देण्यास तयार नाहीत. विड्रो विल्सनने १४ कलमी
योजना जाहिर केली. त्यानुसार स्वातंत्र्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण ती
अपूर्ण राहिली.
(४) लखनौ
कराराने जहाल मवाळ व कॅाग्रेस लीग यांचे ऐक्य झालेले होते. (५)
साम्राज्यांगर्तत स्वराज्य देण्याची घोषण मॉटेग्यूने २० ऑगस्ट १९१७ रोजी
केलेली होती.
१९१९ च्या कायद्यातील तरतुदी
(१)
भारत मंत्र्याच्या कौन्सिलची संख्या ८-१२ करून त्यात ३ भारतीयांचा समावेश
केला. भारतमंत्री व कौन्सिलचा खर्च इंग्लंडच्या तिजोरितून केला (२) भारत
मंत्री व ग. ज. चे काही अधिकार कमी करून भारतीय हायकमिशनर पद लंडनमध्ये
निर्माण केले. त्याचा खर्च भारतीय तिजोरीतून द्यावा (३) कनिष्ठ सभागृहाची
सभासद संख्या १४५-४१ सरकारी १०४ बिन सरकारी (विविध प्रांतांतील) असे
त्यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा असे. (४) केंद्रीय वरिष्ठ सभासद संख्या ६०
असून बिनसरकारी २६, सरकारी ३४ सभासद असून कार्यकाळ ५ वर्षाचा असे (५)
विधान सभा व विधान परिषद अशी दोन सभागृहे निर्माण करण्यात आले.
भारतात प्रांतीय शासन व्यवस्था (द्विदल शासन पध्दत)
१९१९
च्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरु केली यामध्ये केंद्र व
प्रांत यांच्यात विषय विभागणी केंली. विधिमंडळ आणि त्यांचे अधिकार कार्य
इत्यादीचा समावेश होतो. १ एप्रिल १९२१ पासून द्विदल राज्यपध्दतीला सूरवात
झाली परंतू १९२०-२१ असहकार चळवळ प्रारंभीच सुरु झाली १९२१-१९३७ म्हणजे १६
वर्षाच्या काळात द्विदल शासन पध्दत सुरु होती.
जहाल राष्ट्रवादी नेत्यांची उद्दिष्टे आणि कार्यपध्दती
विसाव्या शतकाच्या प्रारंभी एका नव्या जहाल राष्ट्रवादी नेतृत्वामुळे
भारतीय राष्ट्रवादी चळवळीने आणखी एक वरची पायरी गाठली. एक प्रकारे या आधी
झालेल्या राष्ट्रवादी चळवळीच्या फलस्वरुप आणि दुसर्या प्रकारे
साम्राज्यवादाने १९ व्या शतकाच्या शेवटी आपल्याच हेकट धोरणांचा पुनरुच्चार
केल्यामुळे हे घडून आले. १८९७ मध्ये व्हाईसरॉय म्हणून आलेल्या र्लॉड
कर्झनच्या रुपाने हा साम्राज्यवादी हेकटपणा, एकतंत्री वृज्ञ्ल्त्;ाी आणि
कार्यक्षमता प्रकट झाली. राजकीय युक्तिवाद आणि मवाळ चळवळ यांद्वारा आता
राजकीय हक्क मिळणे अशक्य आहे. याची राजकीयदृष्टया जागृत असलेल्या
भारतीयांना जाणीव झाली. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्म होऊन स्वातंत्र्याचे
ध्येय साध्य करण्यासाठी आता आत्मनिर्भर राहून जनतेचा लढाच सुरु करायला
हवा, हे त्यांना कळून चुकले.
देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीही हेच दर्शवीत होती. वसाहतवादी
अविकसिततेच्या फलस्वरुप अर्थव्यवस्थेचा गाडा रुतून पडला होता. ही
परिस्थिती १९ व्या शतकाच्या शेवटी आपले परिणाम दाखवू लागली. याचेच एक
प्रतीक म्हणजे १८९७ त १९०० मधील दुष्काळ या दुष्काळात लक्षावधी लोक
दगावले.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील अनेक घटनामुळेही जहाल राष्ट्रवादाची प्रगती
होण्यास मदत झाली. इसवी सन १८९६ मध्ये इथिओपियाने इटलीचा व इसवीसन १९०५
मध्ये जपानने रशियाचा पराभव केल्याने युरोपीय वर्चस्वाचा फुगा फुटला,
आयर्लंड, रशिया, इजिप्त, तर्कस्तान आणि चीनमधील क्रांतिकारी चहचळींनीही
हेच दाखवून दिले की, जनतेत ऐक्य असेल व स्वार्थत्यागाची तयारी असली तर
वरवर अत्यंत बलशाही वाटणार्या कोणत्याही एकतंत्री परकीय सत्तेला उखडून
टाकता येते.
राजकीय पटलावर आता नव्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला.
त्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपिनचंद्र पाल व लाला
लजपतराय हे प्रमुख होते. भारतीय जनतेने स्वत:च्याप्रयत्नांवर, राजकीय
क्रियाशीलतेवर आणि स्वार्थत्यागावरच आता विसंबून राहिले पाहिजे, असे या
नेतृत्वाचे स्पष्ट मत होते. भारतीय जनतेच्या सामर्थ्यावर आणि जनआंदोलनावर
त्यांचा दृढ विश्र्वास होता. ते ठामपणे सांगत की, एकदा जनता लढयात उतरली
म्हणजे ही राष्ट्रीय चळवळ दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला अशक्य होईल.
म्हणूनच राजकीय कार्यात जनतेला सहभागी करुन घेण्यावर त्यांचा भर होता.
ब्रिटिश साम्राज्यात राहून या सत्तेत सुधारणा करता येतील हे त्यांना मुळीच
मान्य नव्हते