इंग्रजांनी १८७० पासून मुसलमानांना जवळ करण्याचा प्रयत्न केला.
फुटीरतेची भावना जोपासणे व वाढविण्याचे कार्य मुस्लीम नेते सर सय्यद अहमद
खान यांनी केले. त्यांनी १८७५ मध्ये अलीगढ येथे मुहमेडन अॅग्लो ओरिएंटल
कॉलेजी स्थापना केली. पुढे मुस्लीम फुटीरवादी राजकारणाचे प्रमुख केंद्र
बनले सय्यद यांनी १८८६ मुस्लीम एज्यूकेशनल कॉन्फन्रस संघटना स्थापन केली व
समाजाचे ऐक्य घडवून आणले. प्राचार्य बेकच्या सल्ल्यानुसार सय्यद यांनी
१८८८ मध्ये इंडियन पेटि्रअॅटिक असोसिएशन संघटना स्थापन केली. कॅाग्रेसशी
आपला संबंध नाही. इंग्रज हेच खरे मित्र आहेत हि भावना रुजविण्याचा प्रयत्न
वरील मुस्लीम संघटनांनी केला.
राष्ट्रीय प्रवाहापासून मुसलमानांना दुर ठेवून हिंदु मुस्लीम यांच्यात
फुट पाडणे हे इंग्रजांचे ध्येय होते. यातूनच लार्ड कर्झनने १९०५ मध्ये
बंगालची फाळणी केली. त्याला हिंदूंनी विरोध केला. बंगालमध्ये वंगभंग चळवळ
सुरु झाली. त्यामळे व्हाइसरॉय र्लॉड मिंटोने आपल्या अधिकार्यामार्फत
मुस्लीम नेत्यांना कळविले की मुस्लीम शिष्टमंडळाने भेट घेऊन राजकीय
मागण्या कराव्यात त्यानुसार १९०६ मध्ये आगाखानच्या नेतृत्वाखाली सिमला
येथे शिष्टमंडळ भेटले आणि मागण्याचे निवेदन दिले.
(१) मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदार संघ असावा (२) सरकारी नोकर्यामध्ये
ग.ज. च्या कौन्सिलमध्ये राखीत जागा असाव्यात (३) स्पर्धा परीक्षा न घेता
सेवेत उच्च पदावर नियूक्ती करावी
मुस्लीम लीगची स्थापना १९०६
र्लॉड
मिंटोच्या भूमिकेमुळेच मुस्लीम नेत्यांनी १९०६ मध्ये ढाका येथे मुस्लीम
लीगची स्थापना केली. या संघटनेचा उद्देश : (१) ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ
राहणे (२) भारतीय मुसलमानांचे संरक्षण व संर्वधन करणे (३) सरकारकडे
मागण्या करून त्या मान्यतेसाठी आग्रह धरणे.
१९०९ चा कायदा
-सिमला
करारानुसार मुसलमानांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. त्यासाठी
१९०९च्या कायद्यात कॉपेरिशन, विद्यापिठे यामध्ये राखीव जागा दिल्या.
लखनौ करार कॉग्रेस लीग ऐक्य १९१६
बंगाल
फाळणीमुळे हिंदू समाज दुखावला होता. क्रांतिकारी चळवळी वाढल्या अनेक
इंग्रज अधिकार्यांना ठार केले त्यामूळे १९११ मध्ये फाळणी रद्द केली.
खलिफा प्रकरणामृुळे भारतीय मुसलमान इंग्रजांबदल नाराज होते. त्यांनी
इंग्रजांच्याविरूध्द खलिफा वाचविण्यासाठी खिलाफत चळवळ सुरु केले. लखनौ
येथे कॉग्रेस लीगचे ऐक्य होऊन करार केला त्यानुसार (१) ग.ज. च्या मंडळात
निम्मे सभासद लोक नियूक्त हिंदी असावे (२) त्यांची निवड केंदि्रय
कायदेमंडळाकडुन व्हावी (३) केंदि्रय कायदेमंडळात ४/५ पैकी १/३ मुस्लीम लोक
नियुक्त सभासद असावेत.
खिलाफत चळवळ
पहिल्या महायुध्दानंतरही इंग्रजांनी तर्कस्थानविरुध्द युध्द सुरु केले.
त्यामुळे मुसलमानांनी चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला. तर कॉग्रेसला
असहकार चळवळ सुरु करावयाची होती. दोघांनी एकत्र येऊन खिलाफत व असहकार चळवळ
करण्याचा निर्णय प्रमुख नेत्यांचा झाला. त्यामुळे खिलाफत चळवळीत कॉग्रेस
सहभागी झाली. चौरीचौरा प्रकरणामुळे असहकार चळवळ बंद केली. त्यामूळे आपला
कॉग्रेसने विश्र्वासघात केला. असे लीगला वाटू लागले.
बॅ.जिनांची चौदा तत्वे आणि पाकिस्तानची कल्पना
सायमन
कमिशनने स्वतत्र मतदार संघाऐवजी अल्पसंख्याकास राखीव जागा द्याव्या आणि
संधि प्रांतास स्वतंत्र दर्जा द्यावा याला कॉंग्रेसने विरोध करून नेहरू
रिर्पोट सादर केला. तो लीगने फेटाळला मुस्लिमांच्या रक्षणासाठी नेत्यांशी
चर्चा करुन बॅ. जिनांनी १९२९ मध्ये चौदा सुत्री योजना मांडली मुस्लीम
लीगच्या १९३० च्या अधिवेशानाच्या अध्यक्षपदावरून महंमद इकबाल याने वायव्य
मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी केली. केंब्रिज
विद्यापीठातील विद्यार्थी चौधरी रहमत आली यानी हिंदुपासुन मुसलमानांची
पिळवणुक होईल. त्यासाठी स्वतंत्र राष्ट्राची गरज आहे. असेच मत मांडल्याने
द्विराष्ट्र सिध्दांताचा त्यांनी पुरस्कार केला.
जातीय निवाडा आणि प्रांतीय निवडणुका
दुसर्या
गोलमेज परिषदेमध्ये सांप्रदायिक प्रश्नावर एकमत न झाल्याने रॅम्से
मॅकडोनाल्ड यांनी १६ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा. योजना जाहीर केला.
त्यानुसार मुसलमान, दलित, ख्रिश्चन, शीख यांना अल्पसंख्यांक मानून त्यांना
स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला. जातीय निवाडयामुळे समाजात दरी निर्माण
होऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु झाले. १९३५ च्या कायद्याने
१९३७ मध्ये प्रांतिय निवडणुका जाहीर झाल्या या निवडणुकीत १८८५ पैकी ७११
जागा कॉग्रेसने तर ४८९ पैकी १०४ जागा लीगला मिळाल्या आठ राज्यात कॉग्रेसचे
मंत्रिमंडळ स्थापन झाले.
स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीीची वाटचाल
दुसर्या
महायुध्दाच्या काळात कॉग्रेंस लीग यांच्यात ऐक्य करण्याचा इंग्रजांनी
प्रयत्न केले. परंतु ते अशक्य झाले. याच वेळी लीगने कॉंग्रेसकडे अनेक
मागझ्या केल्या (१) संघराज्य नष्ट करावे (२) मुसलमानांचे रक्षण करणारी
घटना बनवावी (३) प्रांतीय सरकारममध्ये लीगला प्राधान्य द्यावे वंदे मातरम
यावर बंदी घालावी काँग्रेसने याला नकार दिला.
क्रिप्स योजनेच्या तरतुदीत भारताच्या फाळणीची बिजे दिसत असल्याने
विभाजनवादाच्या लीगच्या अपेक्षा वाढल्या १९४२ च्या चळवळीत लीगने भाग न
घेता सरकारची बाजू घेऊन काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. भारतापासून वेगळे
होण्यास जनतेने सार्वमत घ्यावे. यामुळे राजाजी योजना लीगने फेटाळुन लावली
पाकिस्तानच्या मुदयावर १९४४ मध्ये गांधी-जिना आणि भुलाभाई देसाई लियाकत
अली यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्या र्लॉड वेव्हेन याने सिमला परिषदेत
कार्यकारिणीतील सर्व मुसलमान प्रतिनिधी केवळ लीगचेच असले पाहिजेत. यामुळे
परिषद अयशस्वी ठरली. त्रिमंत्री मंडळानी १९४६ मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची
मागणी फेटाळली आणि भारताचे तीन विभागात विभाजन केले. बॅ. जिनांनी
पाकिस्तानच्या निर्मितीच्या ध्येयासाठी १६ ऑगस्ट १९४६ हा प्रत्यक्ष
कर्यावाहीचा दिवस म्हणून पाळला. या दिवशी दंगल झाली. ५ हजार हिंदूची कत्तल
कोलकत्यास झाली नेहरूच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर १९४६ रोजी हंगामी
सरकार स्थापन झाले. तो दिवस शोक दिन म्हणून पाळला. ब्रिटिश पार्लमेंटने ३
जून १९४७ रोजी फाळणीची योजना जाहीर केली. त्यानुसार १८ जूलै १९४७ ला
स्वातंत्र्याचा कायदा पास झाला १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारतापासून अलग
झाला.