पृष्ठे

पृष्ठे

सामाजिक सुधारविषयक कायदे

सतीबंदी

(१८२९) सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे. ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते. नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले. पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई. काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई. ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या
किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत. ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.
काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यंानी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडम्ंिांटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले. काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले. सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला १८१२ पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी ४ डिसेंबर १८२९ रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला १८३० मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.

ठगांचा बंदोबस्त

ठग हे कालीमातेचे उपासक होते. लुटीचा व्यवसाय व गंगा नदीत नावाडी म्हणून काम करत असे. विजयादशमीच्या मूहुर्तावर ठग व्यवसायासाठी घरातून बाहेर पडत होते. नवीन व्यक्तीला टोळीत समाविष्ट करताना एक विधी केला जाई. देवीची प्रार्थना केली जाई. उजव्या हातावर रुमाल आणि धंद्याची खूण म्हणून कुर्‍हाड ठेवण्यास येई. प्रवासाला ज्या ठिकाणी ठार मारत त्या ठिकाणास भीळ म्हणत भीळ जवळ आले कह भरोरी रुमाल टाकून खून करणारे प्रवाशंच्या मागे उभे राहात. जयकाली तमाकू लाव असे म्हणत त्यास ठार मारत. त्याचे प्रेत फुगुन वर येऊ नये म्हणून त्याच्या पोटात खुेटी मारत व पुरत असत. या ठगांनी माळवा, मध्य प्रदेश, गंगा नदी, हैद्राबाद येथे धुमाकुळ घातला होता. र्लॉड बेटिंकने हैद्राबादचा निजाम अयोध्येचा वजीर यांची मदत घेऊन कर्नल स्लीमन यांची ठगाच्य बंदोबस्तासाठी नियुक्ती केली. त्याने ३२०० ठग पकडले. १५०० ना फाशी दिली. काहींना पुनर्वसन करण्यासाठी जबलपुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन केली.

बालहत्या प्रतिबंधक कायदा

ज्या कुटुंबाला संतती होत नसे, ते गंगेला नवस करत असत की आपणाला संतती झाल्यास त्यापैकी काही गंगेत सोडू मूल झाल्यावर गंगेला फेकून दिले जाई. ही प्रथा र्लॉड वेलस्लीने १८०२ मध्ये कायदा करुन बंद केली. तसेच ओरिसामध्ये मागासलेल्या खेडयात हतू नावाच्या देवतेसमोर लहान मुलांचा बळी दिला जाई.
मध्ये प्रदेश राज्स्थान, पंजाब,काठेवाड, या प्रदेशात जन्मत:च मुलींना ठार मारले जाई. तिचा श्र्वास कोंडून तिला अफु देऊन तिचे दुध बंद करुन तिचा शेवट केला जाई. कारण मुलीला योग्य वर मिळत नसे किंवा तिच्या लग्नाला खर्चही परवडत नसे हा प्रकार थांबविण्यासाठी १७९५ मध्ये कंपनीने कायदा करुन बालहत्या करणे म्हणजे खून करण्यासारखे आहे असे जाहीर केले. १८०४ मध्ये कायद्याची प्रादेशिक व्याप्ती वाढविली र्लॉड बेंटिंकने विल्किन्स याची नियुक्ती करुन ही प्रथा बंद केली. १८७० मध्ये मुलाच्या जन्माची नोंद करणे जिवंत आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्याची पध्दत सुरु केली.

धार्मिक आत्महत्या प्रतिबंधक कायदा

कंपनी काळात हिंदुस्थानात धर्माच्या नावावर आत्महत्या करण्याचे प्रकार होते. त्यामध्ये मध्ये प्रांतीतील लोकाचा असा समज होती, की देवस्थाननजिकच्या कडयावरुन कडेलोट केल्यास मोक्ष मिळतो अनेक यात्रेकरू कडेलोट करत असत ते कायद्याने बंद केले. गंगेकाठी मरण आल्यास मोक्ष प्राप्त होतो. असा समज असल्याने अनेक मरणोन्मुख लोक गंगेकाठी येऊन पडत असत. ते कायद्याने बंद केले.
बिहार, ओरिसा, प्रांतामध्ये खोंड नावाची जमात होती, ते दैवतास संतुष्ट करण्यासाठी मनुष्याचा बळी देत असत. ते लोक जमिनीत भरपूर उत्पादन मिळावे म्हणूनही नरबळी देत असे. ते कायद्याने बंद केले ही प्रथा चालू असल्याने १८४५ मध्ये नरबळीऐवजी रेडे मारण्याची परवानगी दिली. हिंदू कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर वडिलांच्या संपत्तीचा हक्क रद्द होत असे र्लॉड बेटिंकने या सुधारणा करुन ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्याक्तीला त्याच्या वडिलांच्या संपत्ती मध्ये अधिकार देऊ केला.

गुलामाच्या व्यापारास विरोध

भारतात गुलामगिरीची पध्दत प्रचलित होती. उत्तर भारतामध्ये घरकामासाठी, वेश्या व्यवसायासाठी गूलाम ठेवण्याची प्रथा होती. दक्षिण भारतात शेतकामासाठी गुलाम बाळगत असत. वॉरन हेस्ंिटग्जच्या काळात दरोडेखोरांच्या मुलांना स्त्रियांना गूलाम करावे असा आदेश काढला होता. ब्रिटिश अधिकारी व्यापारी, श्रीमंत लोक आपली विषयवासना तृप्त करण्यासाठी स्त्रियांना गुलाम म्हणून विकत घेत असत. १९ व्या शतकाच्या प्रारंभी १६ रु. पर्यत मुलगा व १५० रु पुरुष आणि १०० ते १००० रु. पर्यत मुली व स्त्रियांची गुलाम म्हणुन विक्रि होत असत.

र्लॉड कॉर्नवॉलिसने :-

१७८९ मध्ये देशाबाहेर गुलामांना पाठविण्यास बंदी घातली. १८०७ मध्ये गुलामगिरी बंद करण्याचा कायदा केला. १८११ मध्ये कायदा करुन भारताबाहेरुन गुलाम आणण्यास बंदी घातली. १८३२ मध्ये कायदा करुन जिल्हयाबाहेर गुलाम पाठवण्यिास बंदी घातली १८४३ मध्ये कायद्याने गुलामगिरी नष्ट केली. तर १८६० मध्ये गुलामगिरीविरुध्द कायद्याचा इंडियन पिनलकोडमध्ये समावेश केला. खानदेश वर्‍हाड स्त्रियांना पळवून नेऊन त्यांचा व्यापार करणार्‍या टोळया होत्या. त्यांचा बेटिंकने बंदोबस्त केला.

पुनर्विवाहाचा कायदा :-

हिंदु

धर्माने स्ंित्रयांना पुरुषांबरोबर स्थान दिले होते. परंतु नंतरच्या काळात पत्नीस दुय्यम दर्जा देण्यात आला. पुरुषांना अनेक विवाह करण्यास धर्मशास्त्राचा विरोध नव्हता बालविवाह झाल्यानंतर प्रौढत्व प्राप्त होण्यापूर्वी एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला तर तिला विधवा म्हणून खडतर जीवन जगावे लागत असे. सुरुवातीस पुनर्विवाहास धर्माची मान्यता होती. परंतु नंतरच्या काळात बंद झाली. पुनर्विवाहापासून प्राप्त झालेली संतती बेकायदेशीर ठरविण्यात येई. राजा राममोहन रॉय यांनी पुनर्विवाहास मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले. ब्राहो समाजाच्या स्थापनेनंतर ही चळवळ सुरु केली. पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर यांनी शास्त्राच्या आधारे सिध्द केले की, हिंदुधर्मशास्त्रांनी पुनर्विवाहास मान्यता दिली. आहे. त्यांनी पुनर्विवाहास मान्यतेसाठी १ हजार लोकांच्या सहयांचे निवेदन पाठविले. धर्ममार्तडांनी ३७,००० लोकांच्या सहयाने निवेदन पाठवून पुनर्विवाहास मान्यता देऊ नये असे कळवले र्लॉड डलहौसीच्या काळात इ.स. मध्ये पुनर्विवाहाचा कायदा मुजूर करण्यात आला. या कायद्यानुसार पुनर्विवाहास व त्यांच्यापासून झालेलया संततीला मान्यता देण्यात आली. बंगालमध्ये पंडित ईश्र्वरचंद्र विद्यासागर महाराष्ट्र्र महर्षी कर्वे, तसेच वीरेसलिंगम पुतलु यांनी पुनर्विवाह कायद्यासंदर्भात मौलिक कार्य केले.